विवाह! वेदांमध्ये सांगितलेल्या सोळा संस्कारांपैकी हा एक महत्वाचा संस्कार! उभयतांच्या आयुष्यातील एक महत्वाचे वळण. सप्तपदी करून नववधू घरात येऊ घातली की, उभयतांना वेध लागतात ते मधुचंद्राचे! विवाहपश्चात हे दुसरे महत्वाचे वळण! एकमेकांना निवांतपणे खऱ्या अर्थाने ओळखण्याचे, समजून घेण्याचे हे दिवस. भविष्यातील सुखी संसाराचे बीज इथेच पेरले जाते. त्यामुळेच या स्थळाची निवडही तितकीच महत्वाची असते.
यासाठी आम्ही आमच्या कंपनीच्या अनुभवावर आधारित भारतातील व इतर देशातील काही खास स्थळे सुचवत आहोत. कारण या स्थळांचा, हॉटेल्सचा रिपोर्ट खूप चांगला आहे. जेथे तुम्ही निवांत राहू शकता, गुजगोष्टी करू शकता. स्थलदर्शन (जे तुमच्या आवडीचे असेल) करू शकता.
Indian